भारतीय टपाल खात्यात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
📌 थोडक्यात माहिती
- विभाग: भारतीय टपाल विभाग (Department of Posts)
- पदाचे नाव: ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) व डाक सेवक (Dak Sevak)
- शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण + संगणकाचे ज्ञान + सायकल चालवण्याचे ज्ञान
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ सप्टेंबर २०२६
| 📋 जाहिरात सारांश | |
|---|---|
| जाहिरात क्रमांक | 17-12/2026-GDS dated 20th August, 2026 |
| पदाचे नाव | ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक |
| शैक्षणिक पात्रता | १० वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान व सायकलिंगचे ज्ञान |
| वयोमर्यादा | १८ ते ४० वर्षे (२१ सप्टेंबर २०२६ रोजी) [मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सूट] |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत (All India) |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (Online) |
| अर्ज शुल्क | General/OBC/EWS: ₹100/- (SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही) |
| अर्ज सुरु होण्याची तारीख | ३१ ऑगस्ट २०२६ (नोंदणी) / ०२ सप्टेंबर २०२६ (अर्ज सादर करणे) |
| अर्ज शेवटची तारीख | २१ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत) |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईटला भेट द्या |
NIC Bharti 2026 | GATE स्कोअरवरून 376 पदांची संधी
📅 महत्वाच्या तारखा
| तारीख / टप्पा | दिनांक |
|---|---|
| जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख | २० ऑगस्ट २०२६ |
| ऑनलाईन वन-टाईम नोंदणी (OTR) कालावधी | ३१ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी १७:०० वाजेपर्यंत) |
| ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची तारीख | ०२ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी १७:०० वाजेपर्यंत) |
| अर्जात दुरुस्ती (Correction Window) कालावधी | २३ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी १७:०० वाजेपर्यंत) |
पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 सविस्तर माहिती व पात्रता
भारतीय टपाल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेत समाविष्ट पदे, त्यांचे वेतनमान आणि वयोमर्यादेतील सूट यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
| पदाचे नाव | वेतन श्रेणी (TRCA Slab) |
|---|---|
| ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | ₹१२,०००/- ते ₹२९,३८०/- |
| असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) / डाक सेवक | ₹१०,०००/- ते ₹२४,४७०/- |
वयोमर्यादेत मिळणारी सूट (Age Relaxation):
| प्रवर्ग (Category) | वयोमर्यादेतील सूट |
|---|---|
| अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST) | ५ वर्षे |
| इतर मागासवर्ग (OBC) | ३ वर्षे |
| आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) | सूट नाही |
| दिव्यांग (PwBD) | १० वर्षे |
| दिव्यांग + OBC (PwBD + OBC) | १३ वर्षे |
| दिव्यांग + SC/ST (PwBD + SC/ST) | १५ वर्षे |
📝 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर जाऊन ३१ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान One-Time Registration (OTR) पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यानंतर ०२ सप्टेंबर २०२६ पासून आपल्या खात्यात लॉगिन करा.
- वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील व प्राधान्यक्रम अचूक भरा.
- Prescribed साईझमध्ये तुमचा अद्ययावत फोटो आणि सही अपलोड करा (कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही).
- सर्वसाधारण/OBC/EWS उमेदवारांनी ₹१००/- परीक्षा शुल्क भरा. (SC/ST/PWD व महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे).
- अर्ज भरून झाल्यावर सर्व माहिती तपासून घ्या व अर्जाची प्रिंटआउट डाऊनलोड करून जतन करा.
- अर्जात काही चूक झाल्यास २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी एडिट विंडोद्वारे दुरुस्ती करता येईल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. याशिवाय मूलभूत संगणक ज्ञान आणि सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे?
२१ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे असावे. नियमानुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाते.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत) आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल? परीक्षा होणार का?
नाही, या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही. निवड प्रक्रिया ही १० वीच्या गुणांवर आधारित गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाते.
अर्ज शुल्क किती आहे?
General, OBC व EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹१००/- शुल्क आहे, तर SC, ST, PwBD, ट्रान्सवुमन आणि सर्व महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे.
