🚨 ताज्या अपडेट्स 🎯 विशेषण – मराठी व्याकरण Notes     |     🎯 सर्वनाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 नाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 शब्दविचार – मराठी व्याकरण Notes     |     🎯 भाषा आणि वर्णविचार – मराठी व्याकरण Notes     |    

नागपूर महानगरपालिका भरती २०२६: १००+ रिक्त पदांसाठी भरती जाहीर; थेट मुलाखत!

📅 प्रकाशित: August 13, 2026 | 📂 भरती

नागपूर महानगरपालिका भरती २०२६ (Nagpur Mahanagarpalika Bharti 2026)

📌 थोडक्यात माहिती: नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अग्निशामक व आपत्कालीन सेवा विभागात विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी अग्निशामक विमोचक (100 पदे) तसेच तांत्रिक सल्लागार व प्रकल्प समन्वयक (02 पदे) भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीतील अटींनुसार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे.

📊 सविस्तर माहिती (Recruitment Details)

भरती विभाग / संस्था नागपूर महानगरपालिका (NMC)
पदाचे नाव १. प्रशिक्षणार्थी अग्निशामक विमोचक
२. तांत्रिक सल्लागार
३. प्रकल्प समन्वयक
एकूण रिक्त पदे १०२ पदे
नोकरी ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अर्जाची पद्धत ऑफलाइन / थेट मुलाखत (Walk-in Interview)
मानधन / वेतन दरमहा रु. २०,०००/- (अग्निशामक पदासाठी)
निवड प्रक्रिया थेट मुलाखत आणि मूळ कागदपत्र पडताळणी

🎓 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

१) प्रशिक्षणार्थी अग्निशामक विमोचक (100 पदे):

  • शैक्षणिक अर्हता: १० वी (माध्यमिक शालांत परीक्षा) उत्तीर्ण, किमान अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण, MSC-IT उत्तीर्ण आणि मराठीचे ज्ञान आवश्यक.
  • शारीरिक पात्रता:
    • उंची: पुरुष किमान १६५ सेमी | महिला किमान १५७ सेमी
    • वजन: पुरुष किमान ५० किलोग्रॅम | महिला किमान ४६ किलोग्रॅम
    • छाती (केवळ पुरुष): ८१ सेमी (न फुगवता) / ८६ सेमी (फुगवून)
  • वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ ते २८ वर्षे | मागासवर्गीय प्रवर्ग: १८ ते ३३ वर्षे.

२) तांत्रिक सल्लागार / प्रकल्प समन्वयक (02 पदे):

  • शैक्षणिक अर्हता: सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त अधिकारी. मोठ्या बांधकाम प्रकल्पांचा किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • वयोमर्यादा: कमाल ६५ वर्षांपर्यंत.

🗓️ महत्त्वाच्या तारखा व मुलाखतीचा पत्ता

🔥 अग्निशामक पद अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)

🔥 अग्निशामक पद मुलाखत तारीख: १७ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:०० ते सायंकाळी ६:००)

📍 अग्निशामक पद मुलाखत पत्ता: मुख्य अग्निशामक अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळमजला, महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१.


🏗️ तांत्रिक सल्लागार पद मुलाखत तारीख: २१ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:३० वाजता)

📍 तांत्रिक सल्लागार मुलाखत पत्ता: अतिरिक्त आयुक्त (सामान्य) यांचे कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर महानगरपालिका.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)


📄 अधिकृत जाहिरात PDF / वेबसाईट


🌐 नागपूर मनपा अधिकृत वेबसाईट

⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.