🚨 ताज्या अपडेट्स 🎯 विशेषण – मराठी व्याकरण Notes     |     🎯 सर्वनाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 नाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 शब्दविचार – मराठी व्याकरण Notes     |     🎯 भाषा आणि वर्णविचार – मराठी व्याकरण Notes     |    

आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती 2026: 2421 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध!

📅 प्रकाशित: August 11, 2026 | 📂 भरती

महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर आयुक्तलयाच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) पदांच्या एकूण २४२१ रिक्त जागा भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📌 थोडक्यात माहिती

  • पदाचे नाव: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक)
  • एकूण जागा: २४२१ पदे (पेसा व नॉन-पेसा क्षेत्र)
  • अर्ज/प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत: ०६ ऑगस्ट २०२६ ते १३ ऑगस्ट २०२६
  • शैक्षणिक पात्रता: पदवी/पदव्युत्तर पदवी + D.Ed/B.Ed आणि TAIT 2025 परीक्षा उत्तिर्ण.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

तपशील तारीख
प्राधान्यक्रम Generate (पसंतीक्रम) करण्याची सुरुवात ०६ ऑगस्ट २०२६ पासून
प्राधान्यक्रम Lock करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२६

पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता विषय / माध्यम
प्राथमिक शिक्षक (शिक्षण सेवक) H.S.C. व D.Ed. मराठी व इंग्रजी माध्यम (सर्व विषय)
माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) B.A. / B.Sc. सोबत B.Ed. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान इत्यादी
उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) M.A. / M.Sc. सोबत B.Ed. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी

*टीप: TAIT 2025 परीक्षेला प्रविष्ट झालेले आणि पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र (Self Certification) पूर्ण केलेले उमेदवारच या प्रक्रियेसाठी पात्र असतील. शैक्षणिक अहर्ता १४ मे २०२५ आणि व्यावसायिक अहर्ता २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्राप्त असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

1
पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळाला tait2025.mahateacherrecruitment.org.in भेट द्या.
2
तुमच्या आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
3
Generate Preference या मेनूवर जाऊन तुमच्या शैक्षणिक अहर्तेनुसार उपलब्ध असलेले प्राधान्यक्रम जनरेट करा.
4
‘Without Interview’ (जास्तीत जास्त १००) आणि ‘With Interview’ (जास्तीत जास्त ५०) साठी योग्य प्राधान्यक्रम निवडून Lock करा.
5
प्राधान्यक्रम Lock केल्यानंतर Reports मेनूमध्ये जाऊन View Locked Preferences द्वारे प्रिंट काढून जपून ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स (Official Links)

🔗 ऑनलाईन अर्ज / प्राधान्यक्रम पोर्टल
🔗 अधिकृत संकेतस्थळ (Department Website)

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. प्राधान्यक्रम लॉक करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी ०६ ऑगस्ट २०२६ ते १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

२. एका उमेदवाराला किती प्राधान्यक्रम लॉक करता येतील?

मुलाखतीशिवाय (Without Interview) निवडीसाठी जास्तीत जास्त १०० आणि मुलाखतीसह (With Interview) निवडीसाठी जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.

३. तांत्रिक अडचणी आल्यास कुठे संपर्क साधावा?

तांत्रिक अडचणींसाठी edupavitra25@gmail.com या अधिकृत ई-मेलवर संपर्क साधता येईल.

एक छोटी सूचना: अचूक व अद्ययावत माहितीसाठी नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरातीला भेट द्या.
⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.